कर्मचारी दर्जा मिळण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन…
अमळनेर:- ग्रामपंचायतीत सेवारत असलेल्या संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी १७ पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतिबंधात संगणक परिचालकाना कर्मचारी दर्जा देऊन त्यांना किमान वेतन साठी पदनिर्मिती करण्याची शिफारस यावलकर समितीने केली होती. तसेच १२ वर्षांपासून संगणक परिचालक स्थिर मानधनावर काम करीत आहेत. संगणकाची मुदत ५ वर्षे असूनही १२ वर्षांपासून संगणक बदललेले नाहीत आणि ग्रामपंचायत विभाग लोकसंख्यानिहाय टार्गेट देत असून ज्यांनी टार्गेट पूर्ण केले नाही त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संगणक परीचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.म्हणून संघटनेने काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला असून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्यांमध्ये कर्मचारी दर्जा मिळेपर्यंत २० हजार रुपये मानधन मिळावे, नव्याने सुरू केलेली टार्गेट पद्धत बंद करावी, जुन्या संगणक परिचालकांची नियुक्ती करणे व ज्यांची नियुक्ती केली त्यांना सात महिन्यांपासून थकीत मानधन मिळावे या मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर राहुल पाटील, किशोर सूर्यवंशी, सुरेश ब्राम्हणकर, सुरेश जाधव, सचिन विंचूरकर, श्याम पाटील, अशोक पाटील, प्रभाकर बिरारी, दीपक चव्हाण, जितेंद्र वाघ, नितीन भोई, तुषार पाटील ,तुषार भदाणे, भाऊसाहेब वारुळे, विनोद पाटील, आकाश पाटील, मुकेश महाजन, भरत पाटील,रवींद्र पाटील, योगेश पाटील, किशोर चौधरी, प्रशांत सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
Related Stories
December 22, 2024