
अमळनेर:- तालुक्यातील धुपी येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे.
धूपी येथील सुदाम माधवराव देसले (वय ५३) यांनी १८ रोजी दुपारी १ वाजेपुर्वी स्वतःच्या राहत्या घरात छताला असलेल्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताचा चुलत पुतण्या रवींद्र बन्सीलाल पाटील यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील,सुनील जाधव करीत आहेत.




