
अमळनेर:- तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे ६१ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक २० रोजी घडली आहे.
तालुक्यातील प्र. डांगरी येथील अशोक बाबुराव बोरसे (वय ६१) हे घरी एकटे असताना त्यांनी घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यावेळी त्यांची पत्नी व मुलगा शेती कामासाठी गेले होते. दुपारी दोन वाजता मुलगा कामावरून घरी आला असता दरवाजा बंद असल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलाच्या खबरीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. मुकेश साळुंखे करीत आहेत.




