
अमळनेर:- भारतीय संस्कृतीत श्री तुलसी विवाह महासोहळ्याला अत्यंत महत्त्व आहे. श्री तुलसी विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह महासोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा निरंतर टिकून राहावी, मंदिरात मोठ्या संख्येने येणाऱ्या विवाह इच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी भगवंताची विशेष आराधना करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी श्री तुलसी विवाह महासोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा हा तपपूर्ती सोहळा आहे.
रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विवाह महासोहळा पार पडेल. त्यानंतर उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे (स्नेह भोजन) आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान श्री विष्णूजी व माता श्री तुलसीदेवी यांच्या या भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात पार पडणाऱ्या विवाह महासोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.




