
अमळनेर:- भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमळनेर येथे सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे.
यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील, मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आ.डॉ बी. एस. पाटील, माजी आ.स्मिताताई वाघ, माजी आ. शिरीष चौधरी,प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार श्री सुराणा, मा. गटविकास अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर प्रसंगी संविधान उद्देशिकाचे वाचन करून मान्यवरांना प्रियंबल भेट देण्याचा कार्यक्रम देखील होणार आहे. यावेळी उपस्थितीचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांनी केले आहे.




