12.50 कोटींच्या कामांचा होणार शुभारंभ, महत्त्वाचे रस्ते होणार चकाचक…
अमळनेर:- अमळनेर मतदारसंघास नामदार अनिल पाटील यांच्या रूपाने मंत्रीपद मिळून थोडाच अवधी झाला असताना याचे फलित विकास कामांच्या मंजुरीच्या माध्यमातून आतापासूनच दिसू लागले असून आज रविवारी व सोमवारी दोन दिवस अमळनेर शहरात नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजनांचा मोठा धमाका होणार आहे.
तब्बल 12.50 कोटी निधीतून 20 ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ यावेळी होणार असून शहरातील बाजार पेठेसह अनेक महत्वपूर्ण रस्त्यांचे उजळणार भाग्य यानिमित्ताने उजळून अनेक रस्ते चकचकीत होणार आहेत. पुढील वर्षाच्या आगमनापूर्वीच शहरातील खराब रस्त्याचे नूतनीकरण करून नव्या वर्षात नव्या रस्त्यांची अनमोल भेट अमळनेरकरांना देण्याचा संकल्प मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.आणि याची सुरुवात रविवार दि 26 नोव्हेंबर पासून होत आहे.महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांच्या विशेष रस्ता निधीतून सदर कामे मंजूर झाली असून पुढील टप्प्यात अजून आवश्यक त्या रस्त्यांची कामे मंजूर होतील अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून ही कामे होणार आहेत.
रविवारी व सोमवारी या भागात होणार भूमिपूजन…
रविवार दि 26 रोजी सकाळी 11 वाजता पाचपवली चौक ते वीर समशेरसिंग पारधी चौक (भोलेनाथ पान जवळ)रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे, रक्कम रु 80,18,722/-, सुभाष चौक ते तिरंगा चौक रस्ता काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 77,39,647/-, स्टेट बँक चौक ते सेवा टाईल्स पर्यंत रस्ता मजबुतीकरणं काँक्रीटीकरण करणे, रक्कम रु 83,72,576/-, मंगलमूर्ती पतपेढी तर बीएसएनएल कार्यालयापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,रक्कम रु 50,17,292/-, लालबाग पाण्याची टाकी ते बोहरी पेट्रोल पंप पर्यंत रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे, रक्कम रु 67,82,900/-, प्रभाग क्रमांक 2 तांबेपुरा मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 50,32,533/- तसेच अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ खुल्या भूखंडावर हॉल निर्माण करणे, (रक्कम रु 40 लक्ष) आदी कामांचे भूमीपूजन स्वतः मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर या व्यतिरिक्त रविवार व सोमवार रोजी चोपडा रोड ते नितीन बिऱ्हाडे यांचे घरापासून ते टाकरखेडा रोड पर्यंत रस्ता गटार बांधकाम करणे, 69.82.677, पैलाड जलकुंभ ते साईबाबा मंदिर,ढेकू हेडावे रस्ता येथे पाईपलाईन टाकणे,रक्कम रु 44.10.077,प्रभाग 6 मध्ये शिवसमर्थ कॉलनीतील गट क्रमांक 1784 भूखंड विकसित करणे,रक्कम रु 12.02.602/-, आर के नगर भागात रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 40.20.558/-, पिंपळे रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 2,00,00,000/-,मिळचाळ भागात व्यायाम शाळेजवळ गटार बांधकाम करणे,रक्कम रु 17,70,810/-, गट नंबर 390/1 मध्ये रस्ता व गटार बांधकाम करणे,रक्कम रु 49,95,669/-, प्रभाग 3 मध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 55,73,136/-,प्रभाग क्रमांक 2 मध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 50,32,533/-, सिंधी कॉलनी भागात ट्रीमिक्स रस्ते काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 60,06,128/-, प्रभाग 6 मध्ये गटार बांधकाम करणे,रक्कम रु 50,64,034/-,प्रभाग 6 मध्ये म्हाडा कॉलनीत रस्ता काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 63,31,666/-,प्रभाग 8 शंकर नगर मध्ये शिरोडे सर ते पिंपळे रस्त्या पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे,रक्कम रु 75,01,304/-, साळी वाडा परीसरात ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे,रक्कम 20,16,685/- नगरपरिषद हद्दीत पुलाचे बांधकाम करणे,रक्कम रु 1,00,00,000/-आदी ठिकाणी नमूद भूमिपूजन होणार आहेत.
सदर विकास कामास भरघोस निधी दिल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार, नगरविकास मंत्री- ना,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.