तर उपसरपंचपदी महेंद्र पाटील यांची ही बिनविरोध वर्णी…
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका गुलाबराव धनगर व उपसरपंचपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन सरपंच सौ. अलका धनगर या स्व. डोंगर बाप्पा यांच्या सून असून कवी रमेश पवार आणि माजी सरपंच सुधाकर पवार यांच्या भावजयी आहेत. यावेळी उपसरपंच महेंद्र पाटील, ग्रा प सदस्य कविता धनगर, सौ. कविता पाटील, सौ. प्रतिभा धनगर, गणेश गुरव,राकेश भिल उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी या निवडीबद्दल नूतन सरपंच व उपसरपंचांचे अभिनंदन केले. गुलाबराव भागवत, रोहित भागवत यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले.
Related Stories
December 22, 2024