योगा हॉलमुळे पत्रकार बांधव व नागरिकांची होणार सोय…
अमळनेर:- अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या मागणीनुसार शहरात भव्य मल्टीपर्पज तथा योगा हॉल उभारला जाणार असून दि २७ रोजी मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या हॉलचे भूमिपूजन करण्यात आले.
सानेगुरुजी शाळेशेजारी असलेल्या खुल्या भूखंडात मंत्री अनिल पाटील यांनी उपलब्ध केलेल्या ४० लक्ष निधीतून हा हॉल निर्माण होणार असून या हॉल मुळे नागरिक व पत्रकारांना योगा हॉल तसेच बसण्या उठण्यासाठी व पत्रकार परिषदेसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपुत , उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर ,सचिव चंद्रकांत पाटील,जेष्ठ पत्रकार संजय पाटील आणि सर्व सदस्य व पत्रकार बंधू यांच्या प्रयत्नांनी हे काम मार्गी लागले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील आणि तत्कालीन नगराध्यक्ष पुष्पलता पाटील व या परिसरातील रहिवाशी यांच्या सहकार्याने ही जागा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळाली आहे.माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निधीतून १० लाख रुपयांचे वॉल कंपाउंड झाले होते.आता मंत्री अनिल पाटील यांच्या मदतीने भव्य हॉल साकारला जात असून यासाठी नपाचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,अभियंता अमोल भामरे, अभियंता दिगंबर वाघ आदींचे सहकार्य लाभत आहे.
दरम्यान सदर भूमिपूजन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,मराठा समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख,माजी नगरसेवक सुभाष अग्रवाल,डॉ दिनेश महाजन, बीडीओ सुशांत पाटील,एल टी पाटील,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,उपाध्यक्ष जितू ठाकूर,सचिव चंद्रकांत पाटील, संजय पाटील, तसेच पंडित नाना चौधरी, डीगंबर महाले,पांडुरंग पाटील, किरण पाटील, महेंद्र रामोशे, मुन्ना शेख,आर जे पाटील, अमोल पाटील, मिलिंद पाटील, आबीद शेख,युवराज पाटील, गणेश पाटील, कुंदन खैरनार, उमेश काटे, जयेश काटे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, नूर खान, रवी मोरे, उमेश धनराळे, जयंत वानखेडे, सत्तार खान यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.