
अमळनेर:- तालुक्यातील प्र.डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी २३ वर्षीय स्वप्नील शिसोदे या तरुणाची निवड करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कै. प्रल्हाद राजाराम शिसोदे यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त जागेवर एकमताने त्यांचा नातू चि. स्वप्निल उदय शिसोदे यांची निवड करण्यात येवून चेअरमन पदाचा मान देण्यात आला. तसेच सात्री येथील संचालक कै. रोहिदास बाविस्कर यांचे निधन झाल्याने रिक्त जागेवर प्रताप शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी व्हॉईस चेअरमन पोपट भोई, संचालक विनोद शिसोदे, प्रदीप शिसोदे, दिलीप शिसोदे, आनंदराव शिसोदे, कैलास शिसोदे, आनंद वाडीले, भास्कर कोळी, मनोहर बोरसे, सौ. विमलबाई शिसोदे, सौ. अर्चना पाटील, सचिव विलास वाडीले यांची उपस्थिती होती. तरुण स्वप्निल शिसोदे याची बिनविरोध निवड करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सत्कार करत सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले आहे.




