अमळनेर:- तालुक्यातील मारवड व लोण बु. येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले.
तालुक्यात लोण बु येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बंधूंना ५% दिव्यांग निधीचे वाटप करण्यात येवून विशेष मतदार नोंदणी दिनानिमित्त दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी लोण बु. चे लोकनियुक्त सरपंच कैलास भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य भटू संदानशिव, नाना पाटील, उमेश पाटील, भास्कर पाटील, दौलत पाटील,विलास पाटील, राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते शरद खैरनार, पोलिस पाटील सौ.नालंदा शरद खैरनार, ग्रामसेवक ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, कर्मचारी विश्वनाथ धनराज वारुळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मारवड येथे दिव्यांग दिन साजरा…
तालुक्यातील मारवड ग्रामपंचायत कार्यालय येथे ३ रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधवानी आपल्या समस्या व मागण्या मांडल्या. ग्रामविकास अधिकारी नितीन पाटील यांनी ज्या मांगण्या असतील त्या सर्व सोडविण्यात येतील. यासाठी सर्व सहकार्य ग्रामपंचायत तयार आहे, असे सांगितले. यावेळी उपसरपंच भिकन पाटील, सुभाष भील, ग्रामसेवक नितीन पाटील, लिपिक सुभाष पाटील, कर्मचारी दिव्यांग बंधू चंद्रकांत साळुंखे, योगेश पाटील, संगीता चौधरी, समाधान शिरसाठ, दगडू भील, सद्गुरू कोळी, इस्माईल खाटीक, अरुण बेलदार, जयराम कुंभार, तुकाराम चौधरी आदी उपस्थित होते.