
अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रा डॉ संजय सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवड प्रसंगी लोकनियुक्त सरपंच हिराबाई दयाराम भिल, मंगेश पाटील, रामराव पाटील, आशाबाई अवचिते, छोट्याबाई मुसे, लताबाई पाटील, कविता पाटील, ज्योतिबाई पाटील, सुनीता पाटील हजर होते. उपस्थित ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला.




