
ध्वजारोहण करून मंडप उभारणीचा झाला शुभारंभ…
अमळनेर:- गेल्यावर्षीप्रमाणे शहरात यंदाही रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने 14 डिसेंबरपासून रोटरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून 14 पासून 17 पर्यंत चार दिवस हा उत्सव रंगणार आहे.
उद्योगपती प्रवीण साहेबराव पाटील यांच्या आर.के. नगर समोरील फॅक्टरीच्या गेल्या वर्षीच्या भव्य जागेतच हा उत्सव होणार असून दि. 2 रोजी रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत विधिवत पद्धतीने ध्वजारोहण करून मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. रोटरीचे विद्यमान अध्यक्ष प्रतीक जैन यांच्या हस्ते पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले. पौरोहित्य वैद्य गुरुजी यांनी केले.यावेळी रोटरी सदस्य माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, उद्योगपती प्रवीण साहेबराव पाटील, सेक्रेटरी देवेंद्र कोठारी, लालचंद सैनांनी,डॉ अनिल वाणी, चेलाराम सैनांनी,प्रीतपालसिंग बग्गा, सुहास राणे, प्रदीप जैन, अजय रोडगे, रोहित सिंघवी, अविनाश अमृतकर,मुन्ना पारेख, पूनम कोचर, विवेक देशमुख, महेश पाटील, प्रशांत निकम, किर्तीकुमार कोठारी,ऍड गोपाल सोनवणे,ऋषभ पारेख,राजेश बेदमुथा, योगेश वाणी,आशिष चौधरी, जितेंद्र चंद्रात्रे, विशाल शर्मा, दिनेश रेजा,ईश्वर सैनांनी, ताहा बुकवाला, धीरज अग्रवाल यासह रोटरी सदस्य उपस्थित होते.
दरम्यान या उत्सवाची जय्यत तयारी आतापासूनच सुरू झाली असून यंदाच्या उत्सवात नावीन्यपूर्ण काय असेल याचा खुलासा लवकरच आयोजकांकडून होणार आहे. मात्र चार दिवस मोठी धम्माल असेल असेही आयोजकांनी म्हटले असून अमळनेरवासीयांनी ते चार दिवस आतापासूनच राखीव ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.




