अमळनेर:- तालुक्यातील नंदगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रमेश ओंकार पारधी हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.
१ डिसेंबर रोजी शिक्षण विभागातील अधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय समिती चेअरमन ज्ञानेश्वर पाटील,प्रवीण पाटील, केंद्रप्रमुख किरण शिसोदे,शिक्षक भगवान सुर्यवंशी, धीरज माळी, अरुण मोरे,भावना बेहरे उपस्थित होते.यावेळी त्यांच्या धर्मपत्नी चंद्रकला पारधी, मुले कमलेश दाभाडे,हेमंत दाभाडे तसेच आप्तेष्ट उपस्थित होते. रमेश पारधी यांनी याआधी चौबारी, पाडसे, खेडीढोक, राजवड, गांधली- पिळोदे येथे सेवा बजावली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज माळी यांनी केले.