सरपंच परिषदेकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे हस्ते गौरव…
अमळनेर:- तालुक्यातील दहीवद गावाचे सुपुत्र कोपरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले याना सरपंच परिषद मुंबई यांचेमार्फत “उत्तम प्रशासक” पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांचे अध्यक्षतेखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.
यशदा सभागृह पुणे येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार अभिमन्यू पवार औंसा,आमदार सुनील शेळके (मावळ), आमदार कृष्णा गजबे (आरमोरी), नवनाथ ढवळे (पोलिस उपायुक्त भिवंडी), दत्ताभाऊ काकडे (प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद) उपस्थिती होते. वासुदेव देसले हे समाजाभिमुख पोलिस म्हणून अत्यंत महत्त्वाची जातीय सलोखा तसेच आदिवासी व्यक्तींना पूरग्रस्त स्थितीत मदतीचे साहस पूर्ण केलेले कार्य याची दखल घेवून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.