तरुणांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्याच्या गृहखात्याच्या आकृतीबंधानुसार अनेक रिक्त पदे आहेत आणि कोरोना काळामुळे ३ मार्च २०२३ ची वय वाढीची मर्यादा ३१ डिसेंबर असल्याने शासनाने तत्पूर्वी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी अनेक तरुणांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या काळात पदांची भरती बंद होती आणि अजूनही भरती निघालेली नाही म्हणून शासनाने डिसेंबर मध्येच भरती प्रक्रिया सुरू करावी तसेच वय मर्यादा एक वर्षाने वाढवून द्यावी अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली असून आगामी अधिवेशनात याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. निवेदनावर राकेश पाटील, हरीश धनगर, विवेक बोरसे, मयूर सोनवणे, विजय भोई, जयेश भोई,सागर पाटील, मयूर पाटील, राकेश प्रकाश पाटील, श्रीकांत पाटील,अमोल कुंभार,कल्पेश पाटील, कमलेश सोनवणे, विक्रम पाटील, मुकेश माळी, स्वप्नील महाजन यांच्या सह्या आहेत.