दिवसभर भक्तांची मांदियाळी, कार्यक्रमाची होती रेलचेल..
अमळनेर:- तालुक्यातील मारवड- गोवर्धन येथील जागृत देवस्थान भारतातील तीन स्वयंभू कालभैरवनाथांपैकी एक असलेल्या श्रीकालभैरवनाथांचा यात्रोत्सव हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी व भंडाऱ्याचा महाप्रसासाठी दिवसभर रीघ दिसून आली.
माळण नदिकाठावर असलेले मारवड परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या स्वयंभु काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी नदीपात्रात लाखो भाविकांची गर्दी उसळली. प्रारंभी पहाटे ५ वाजता धुप ध्यान आरती होऊन ६ वाजता ध्वजारोहण झाले. मान्यवर पाच जोडप्याचे हस्ते होमपूजन झाल्यावर सकाळी ९ वाजेपासून उशिरापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु होता. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर भैरवनाथांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर रात्री निरंकारी भजनी मंडळ दिवसभर भैरवनाथांचा जागर करून सेवा दिली व भाविकांच्या मनोरंजनासाठी माळण नदीच्या पात्रात लोकनाट्य तमाशा झाला.
अमळनेरचे आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सकाळी सपत्नीक जयश्री पाटील यांच्या समवेत पूजन करून दर्शन घेतले. कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज, माजी आमदार स्मिता वाघ, भैरवी वाघ पलांडे, माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील, तहसीलदार रुपेश सुराणा, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, तिलोत्तमा पाटील, मार्केटचे सभापती अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, संचालक सचिन बाळू पाटील, माजी सभापती प्रफुल्ल पवार यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली. तसेच यावेळी भाविकभक्तांकडून चांदीचे पाळणे, चांदीचे डोळे, व बांधकामासाठी उदार हस्ते दान मिळाले. मारवड गोवर्धन बोरगाव ग्रामस्थांकडून महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय शितलकुमार नाईक, पीएसआय विनोद पाटील, हवालदार सुनील तेली , फिरोज बागवान, सचिन निकम, मुकेश साळुंखे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गोवर्धन व मारवड या दोन्ही ग्रामपंचायतींनी मुलभूत सुविधा पुरविल्या, बसेस एक तासाआड उपलब्ध असल्याने खाजगी वाहन धारकांनी नियमित शुल्क घेऊन भाविकांना मंदिर परिसरात सोडले. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी मंदिर संस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सलग तीन दिवस परिश्रम घेतले
पाडळसरेत केसरी भैरवनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई…
पाडळसरेत केसरी भैरवनाथ मंदिरावर अष्टमी जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सरपंच शुभांगी पाटील व सचिन पाटील यांनी मंदिर परिसरात युवकांच्या माध्यमातून साफ़ सफाई करत मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे वावडे येथील पोलीस पाटील हभप डॉ दत्ता ठाकरे , शिरसाळे येथील पोलीस पाटील रामचंद्र चौधरी, लोणसिमचे कांतीलाल पाटील, पत्रकार वसंतराव पाटील,उमाकांत पाटील, गोपाल कोळी, लोण बुद्रुक पोलीस पाटील नालंदा खैरनार, तनुजा पाटील, सात्रीचे पोलीस पाटील विनोद बोरसे यांनी मंदिर परिसर स्वच्छता मोहीम हाती घेतली तर महिला पोलीस यांनी आकर्षक रांगोळी काढून शोभा वाढवली. सकाळी लोण खुर्दच्या पोलीस पाटील तनुजा शिंदे व उदय शिंदे यांनी सपत्नीक अभिषेक, पूजा आरती करून ध्वजारोहण करण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील भरत वर्मा व उज्वला अग्रवाल यांनी नैवेद्य दाखवून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे मानकरी होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था युवकांनी स्वयंप्रेरणेने करून भैरवनाथ अष्टमी उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.