
अमळनेर शहरातील अयोध्या नगर भागातील होते रहिवासी…
अमळनेर :- शहरातील अयोध्या नगर भागातील रहिवासी व गोहाटी (श्रीनगर) येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत असणाऱ्या जवानाचे ०५ डिसेंबर रोजी कर्तव्यावर असतांना आकस्मित निधन झाले होते. त्याच्यावर आज दि.६ रोजी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहरातील अयोध्या नगर बंगाली फाईल येथील रहिवासी विशाल खैरनार हवालदार सीआरपीएफ यांचे दिनांक ०५ रोजी गोहाटी (श्रीनगर) येथे सेवार्थ असताना आकस्मित निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथे विमानाने येऊन कारने मुंबईहुन ६ रोजी सकाळी ०५ वाजता अमळनेर येथे आणण्यात आले. सकाळी १० वाजता वीर जवान रॅली अमळनेर शहरातून ते टाकरखेडा रोड वरील आश्रम शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेपर्यंत काढत त्याठिकाणी शासकीय श्रद्धांजली व सीआरपीएफ जवान व अधिकारी यांची व पोलीस मुख्यालय यांची सलामी देण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर, प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेश सुराणा, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




