
मंडळाधिकारीमार्फत चौकशी करून ८५ जातीच्या प्रमाणपत्रांचे वाटप…
अमळनेर:- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या वस्तीत वंचित राहिलेल्या मतदारांची घरोघरी जाऊन नोंदणी करून घेतली. तसेच त्यांना घरी जाऊन जातीचे प्रमाणपत्र दिले.
शहरातील पारधीवाडा भागात जाऊन महसूल अधिकाऱ्यांनी मतदारांची ऑनलाईन नोंदणी करून घेतली. विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नव्याने ५२ मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पारधी समाजाचे असूनही पुरेसे कागदपत्र नसल्याने अनेकांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नव्हते. आणि या समाजाचे बहुसंख्य लोक मजूर व अनाडी असल्याने कागदपत्रे मिळवू शकत नाहीत व पुरावे गोळा करू शकत नाहीत म्हणून मंडळाधिकारीमार्फत चौकशी करून सुमारे ८५ जातीचे प्रमाणपत्र घरोघरी जाऊन देण्यात आले. यावेळी अनिल शिंदे, संजय पारधी, पंकज पवार, राहुल पवार, पप्पू पवार,भीमराव पवार, प्रवीण पवार, विजय चौधरी, करण सोनवणे, पंकज दाभाडे, धनराज पारधी, सुनील पारधी, कमाबाई पारधी, आकाश पवार लटपटे, व बीएलओ हजर होते.




