
अमळनेर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित शासकिय शालेय राज्यस्तरिय टेनिक्वाईट स्पर्धासाठी खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कुलच्या नरेश सुदाम सोनवणे (१४ वर्षाआतील), रोहन कैलास बाविस्कर (१७ वर्षाआतील)ह्या दोघांची निवड राज्यस्तरिय स्पर्धासाठी झाली आहे.
सदर स्पर्धा दिनांक ८ ते ११ डिसेबर २०२३ पर्यंत भानु तालिम व्यायाम शाळा मिरज जि.सांगली येथे संपन्न होणार आहे. दोंडाईचा जि. धुळे येथे झालेल्या विभागिय टेनिक्वाईट शालेय स्पर्धेतुन त्यांची निवड करण्यात आली.सदर राज्यस्तरिय स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्पर्धाचा संघ निवडला जाईल.
वरिल दोन्ही खेळांडुचा सन्मानचिन्ह देऊन सत्कांर करण्यात आला. खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे , कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ,शालेय समिती चेअरमन हरी भिका वाणी, मुख्याध्यापक बी एस पाटील, उपमुख्याध्यापक सी एस पाटील, पर्यवेक्षक एस बी निकम, शिक्षक प्रतिनीधी ए डि भदाणे, जेष्ठ शिक्षक डि एम दाभाडे, शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख एस एम पवार, एस आर शिंगाणे, सी एस सोनजे, के पी पाटील यांनी अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. वरिल खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख एस पी वाघ व के आर बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.




