
सात लहान बालकांचा समावेश, तीन गंभीर रुग्ण धुळ्याला रवाना…
अमळनेर:- तालुक्यात दोन दिवसात १३ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असून तिघांना गंभीर चावा घेतल्याने धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.
१८ रोजी सायंकाळी कसाली मोहल्ल्यातील आखाडा चौकात एकाच कुत्र्याने हल्ला चढवत अली खान मोहसीन खान (वय ९), शाहनवाज शाह फिरोज शाह (वय ९) , परवेज शाह आसिफ शाह (वय ८) या तिघांवर खेळत असताना एकाला पाठीवर दोघांच्या हातावर गंभीर चावा घेतला. त्यापैकी मोहसीन व शाहनवाज या दोघांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सारबेटा येथील ४० वर्षीय शशिकांत पाटील, ताडेपुरा येथील सात वर्षाचा इशांत भिल, आरोही पाटील (वय ८ वर्षे), कस्तुराबाई माळी, प्रशांत कोळी (वय ११), राजेश रणदिवे (वय ३८), देविदास पवार (वय ६५), मयुरेश विसपुते (वय २४), राम लखवाणी (वय ४२), जयेश गायकवाड (६ वर्षे) यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जयेश याला देखील गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी धुळ्याला रवाना केले आहे. इतरांवर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




