
अमळनेर:- तालुक्यातील मुडी येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ची विद्यार्थिनी आदिती विश्वनाथ पाटील हीने सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस बॉल वैयक्तिक दुहेरी स्पर्धेमध्ये प्रथम तर सांघिक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागातील विद्यर्थिनी राज्यात प्रथम आल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिला दुहेरी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक तर सांघिक स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे. प्रशिक्षक प्रा. विजय बी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पाटील व क्रीडा प्रेमींनी तिचा सत्कार केला.




