
काल पैलाड ते बसस्थानकादरम्यान घडली घटना…
अमळनेर:- यावल धुळे बस मधून एका महिलेची २९ ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १९ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास पैलाड ते बसस्थानकच्या दरम्यान घडली.
रत्नाबाई सुरेश पाटील( रा चुंचाळे ता चोपडा) ही वृद्धा अमळनेर येथे लग्नासाठी येत असताना ही घटना घडली. महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




