
तालुक्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीने दिले तहसीलदारांना निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजप सरकारचा खासदारांच्या निलंबनाबत लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप करत निषेध करणारे तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुण संसदेत प्रवेश करून स्मोक हल्ला केला या घटनेबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत सविस्तर निवेदन केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत करावे या मागणी करणाऱ्या दोन्ही सभागृहातील एकूण १४२ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. ही एकप्रकारे लोकशाही तत्वाची हत्या आहे. तसेच लोकशाहीच्या या अपमाना विरोधात इंडिया आघाडीतर्फे विरोध व निषेध करुन भाजप सरकारचा धिक्कार करत आहोत. तसेच लोकशाही ही शेवटची घटीका मोजत आहे, असे केंद्र सरकारच्या धोरणावरुन लक्षात येत आहे. पण जनता यांना येत्या काळात धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. तसेच निलंबन केलेल्या खासदारांचे निलंबन हे तात्काळ मागे घेण्यात यावे. निलंबन मागे न झाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंडिया आघाडी अमळनेर यांनी दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी माजी आमदार डॉ बी एस पाटील, काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, तिलोत्तमा पाटील, बी के सुर्यवंशी, भारती पाटील, हर्षल जाधव, तौसिफ तेली, तुषार संदानशिव, अब्दुल रज्जाक शेख,विवेक पाटील, रोहिदास पाटील, प्रताप पाटील, उमेश पाटील, सचिन वाघ, रामकृष्ण पाटील, कन्हैयालाल पाटील, भिवसन पाटील, डी एम पाटील, अरुण शिंदे, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, विलासराव पवार आदी उपस्थित होते.




