
चंद्राई बिग बिलेनियर मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे ६ जानेवारी रोजी आयोजन…
अमळनेर:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत चंद्राई बिग बिलेनियर मल्टीपर्पज फाउंडेशन धुळे तर्फे विविध पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक ६ जानेवारी रोजी ह्या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून शिक्षक -शिक्षिका गौरव, लेखक -लेखिका गौरव, क्रीडा गौरव, कृषी गौरव, समाज गौरव ,साहित्य गौरव, युवा गौरव, इत्यादी विविध पुरस्कारासाठी नामांकन अर्ज मागविण्यात येत आहेत. समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, कला, कृषी इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुषांना अमळनेर येथे ६ जानेवारी २०२३ रोजी स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासाठी नामांकन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी विशेष कार्यक्रम अधिकारी प्रमोद पाटील (मोबाईल क्रमांक 9881194816) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




