अमळनेर:- प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक अमित नारायण शिंदे यांना व्हर्चुवल रिॲलिटी प्रोजेक्तींग डीव्हाइस फॉर इंपर्टींग एज्युकेशन या आशयाचे भारत सरकार कडून पेटंट प्रदान करण्यात आले.
शैक्षणिकदृष्ट्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व त्याबद्दल जागृती होण्यासाठी गरजेचे असलेले वर्चुअल रियालिटी आता शैक्षणिक कामात सुद्धा आपलं योगदान देणार असे प्रतिपादन प्रा. अमित शिंदे यांनी केले. या प्रसंगी प्रताप महाविद्यालय संस्थेचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल व प्राचार्य डॉ. अरुण जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आय क्यू ए सी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पुष्पा पाटील हे उपस्थित होते.