अमळनेर:- शहरात दिनांक २५ रोजी राम मंदिर अयोध्या अक्षता कलशाचे भव्य रथ यात्रा मिरवणूक पडणार असून सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले जात असून या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत पार पडणार आहे. या निमित्त संपूर्ण देशभरात अयोध्येतून पूजीत असे अक्षता कलश पाठवले गेले आहे. आणि हे अक्षता 1 ते 15 जानेवारी या काळात सर्व राम सेवकांकडून प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक घरापर्यंत पोहचवले जाणार आहे. तरी हा अक्षता कलश अमळनेर येथे आला असून त्या निमित्ताने शहरातील श्री रामजन्मभूमी आनंद उत्सव समिती, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्याद्वारे या कलशाची भव्य रथ यात्रा मिरवणूक शहरात दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता निघणार आहे. कलश रथयात्रा स्वामी नारायण मंदिर येथून निघणार असून पुढे सुभाष चौक – दगडी दरवाजा – वाडी चौक – भोई वाडा – माळी वाडा – झामी चौक – पवन चौक – तिरंगा चौक – बस स्टँड – आणि शेवट विजय मारुती मंदिर येथे समाप्ती होणार आहे.