
मांडळ रस्त्यावर घडली घटना, एक जखमी…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने चारचाकीचे नियत्रंण सुटून अपघात झाल्याची घटना दिनांक २५ रोजी सायंकाळी घडली आहे. यात एकजण जखमी झाला आहे.
अमळनेर येथील प्रशांत कैलास वायकर हे आपले चारचाकी ह्युंडाई एक्सेंट एमएच १९ सीएफ ९२९९ या वाहनाने मांडळ मार्गे सोनगीरकडे जात असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वावडे येथील पेट्रोल पंपाच्या पुढे मांडळ रस्त्यावर अचानक कुत्रे समोर आल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले. आणि चारचाकी चारीत उतरून पलटी झाल्याने गाडीचे नुकसान झाले व प्रशांत वायकर यांना मुका मार लागला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना भरत ईशी हे करीत आहेत.




