
अमळनेर:- तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे ४२ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक २६ रोजी घडली आहे.
डांगरी येथील जितेंद्र शांताराम शिसोदे (वय ४२) यांनी राहत्या घरी छताच्या लाकडी कड्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दुपारी दोन वाजता उघडकीस आले. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रशांत शिसोदे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.




