अमळनेर:- येथील बंगाली फाईल परिसरात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी सामाजिक न्याय विभाग मार्फत मंजूर झालेल्या 30 लाख रुपये रक्कमेतून रस्ता काँक्रिटिकरण कामाचे कामाचे भूमिपूजन मा.जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जयश्री पाटील या भागात आवश्यक ती विकासकामे देण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी माजी नगरसेविका सौ.शितल यादव, मा.नगरसेवक प्रा अशोक पवार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र यादव , भरत पवार, प्रविण पाटील, चंद्रकांत मोरे, यशवंत बैसाणे, प्रकाश माळी, मनिषा संजय पाटील, मनिषा शिंदे, शोभाबाई टरले, ताराबाई गोयकर, मंजुळाबाई कोळी, वच्छलाबाई फणसे, इंदुबाई मराठे, सुनिता माने, मनिषा गुजर, सुनंदाताई चौधरी, ज्योती मनोज शिंदे, मालुबाई ठाकुर, लताबाई परदेशी, नंदाबाई काळे, कमलबाई कदम, आशा सांळुखे, गंगुबाई कदम, रोहीणी जाधव, मोहीनी गायकवाड, शितल कदम यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.