अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कु. महेश्वरी साळुंखे हिने लीप फॉर वर्ड ह्या उपक्रमात सहभाग घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचा नुकताच सत्कार करण्यात आला.
मारवड येथील हरिनाम सप्ताह कार्यक्रमात विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु कु.महेश्वरी रवींद्र साळुंखे हिने लीप फॉर वर्ड ह्या इंग्रजीच्या उपक्रमात जळगाव जिल्हात क्रमांक पटकावला. त्याबद्दल जिप सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी जिप सदस्य शांताराम पाटील, सुलोचना पाटील, उपसरपंच भिकन पाटील, हरिभाऊ मारवडकर, गोवर्धन सरपंच पंकज निकम, उमाकांत साळुंखे, शिक्षक मोरे, आदी उपस्थित होते.
Related Stories
December 22, 2024