
अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील स्व. आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाची सहल गुजरात राज्यातील सुरत दर्शन सहल उत्साहात पार पडली. यात मुलांनी नेचर गार्डन (प्राणी संग्रहालय),सायन्स सेंटर, गोपी तलाव, मत्सलाय ,गुरुकुल स्वामी नारायण मंदिर दर्शन,डुंबस बीच, उमिया धाम, सुरत शहराची सफर करून सहलीचा आनंद लुटला.चेअरमन माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजनात ही सहल झाली.
नेहमी प्रमाणे यंदाही विद्यालयाची शैक्षणिक सहल लांबच्या प्रेक्षणीय स्थळी नेण्याचा मानस सहल प्रमुख म्हणून जितेंद्र ठाकूर, मिलिंद पाटील व वाल्मिक पाटील यांचा होता; पण दुष्काळी परिस्थिती पहाता अनेक प्रयत्न करूनही शक्य झाले नाही. शेवटी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी सुरत हा जवळचा स्पाॅट सूचवला.
खानदेश और सुरत की शान खासदार सी आर पाटील, छोटुभाई पाटील इनके धन्यवाद…
गुजरात राज्यात सुरत शहरा बाहेरील बसेस फिरण्याची परवानगी नाही. त्यामुळे येथील विविध स्थळांना भेटी देण्याचा बाका प्रसंग उदभवला असता सुरतचे खासदार सी आर पाटील यांचे निकटवर्तीय छोटुभाई पाटील यांनी नगरपालिकेच्या बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे या बसेस उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार होता.छोटुभाई पाटील यांनी पी.पी. सावनी ग्रुपचे उल्हास पवार यांचेशी संपर्क करून २ लक्झरी उपलब्ध करून दिल्या. यामुळे गुजरात दर्शन करणे सोयीचे झाले.
खान्देशातील बोरकुंड येथील मूळ रहिवासी व उधना येथील भावना हॉस्पिटलचे डॉ रवींद्र पाटील, लायन्स क्लबच्या डॉ सौ मंगलाताई रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्याना भेट वस्तू दिल्या व मनोगतातुन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.लक्ष्मीकांत बोरसे, सौ चेतना लक्ष्मीकांत बोरसे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.उमियामाता परिवारचे ट्रस्टी तथा नगरसेवक राजेंद्र पटेल, ट्रस्टचे उपाध्यक्ष जयसूख भाई पटेल यांच्या द्वारा सर्व व्यवस्था करण्यात आली.तसेच अमळनेर पंचायत समिती सदस्य व सुरतला शून्यातून विश्व निर्माण करणारे भिकेश पावभा पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.
मामाच्या गावाचे विशेष अप्रूप…
सुरतचे उपमहापौर डॉ. नरेंद्र पाटील यांचे मामाचे गाव लोंढवे असल्याने त्यांना विशेष आनंद झाला. ते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, योगा-योग माझ्या मामाचे गाव लोंढवे येथील काकासाहेब स्व. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाची सहल सूरत पर्यटनसाठी आली आहे आणि माझे प्रिय मित्र पत्रकार जीतू ठाकुर व प्रमोद बहिरम यांनी संपर्क केल्यामुळेच मला माँ ऊमीयाधाम ट्रस्टच्या प्रांगणात सहलीतील सर्व सन्माननीय शिक्षक मित्रांसह विद्यार्थ्याशी भेट घेता आली व दर्शन करण्याचा सौभाग्य प्राप्त झाले अशी भावना व्यक्त केली.
सहल यशस्वितेसाठी यांनी दिले मोलाचे योगदान…
स्वप्नील पाटील,विलास पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील ह्यांच्यासह सहल सोबत शिक्षक दीपक पवार, मिलिंद पाटील, महेश पाटील, मनोहर पाटील, जितेंद्र ठाकूर, पी. पी. पाटील, दीपक वाघ, प्रमोद बहीरम, दिलीप पाटील, भारती बहिरम, प्रगती पाटील यांनी सहल यशस्वितेसाठी सहकार्य केले.




