धार रस्त्यावरील क्रिडा संकुलाजवळ घडली दुर्घटना…
अमळनेर:- शहराबाहेरील धार रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ एसटी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.
तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी व सध्या शहरातील पिंपळे रोड भागातील वामन नगरातील रहिवासी प्रीतम गजमल शिंदे (वय ४९) हे ३० रोजी नेहमीप्रमाणे दुचाकीने शेतीच्या कामानिमित्त बोरगाव येथे जाण्यास निघाले. दुपारी एक वाजेच्या सुमारास धार रस्त्यावरील क्रीडा संकुलाच्याजवळ वळणावर समोरून येणारी अमळनेर तांदळी एसटी बस (क्रमांक एमएच ४० एन ९०८२) व दुचाकीची धडक झाल्याने त्यांच्या डोक्यास, तोंडास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयताचा पुतण्या मुकुंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना जयंत सपकाळे करीत आहेत.
मयत प्रीतम शिंदे हे मारवड हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी. बी. शिंदे यांचे सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा असून यावेळी त्यांच्या पत्नी, मुलगा व वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्यांचा या दुर्दैवी अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Related Stories
December 22, 2024