
अमळनेरात १७ वाहनचालकांवर पोलिसांनी केली कारवाई…
अमळनेर:- ३१ डिसेंबर निमित्त पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेल्या बंदोबस्तामुळे जुन्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत शांततेत झाले. ड्रंक अँड ड्राईव्हची एकही केस झाली नाही मात्र १७ वाहनचालकांवर विविध केसेस करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या वाहतूक पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे, पोलीस नाईक विलास बागुल, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कोठावदे, महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे, मोनिका पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी यांनी बिना नंबर प्लेटच्या दहा, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या एकावर, सीट बेल्ट नसलेल्या दोन चारचाकींवर, वाहन परवाना नसणाऱ्या दोन व ट्रिपल सीट च्या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात एकूण ९ हजार ७०० रुपये दंडापैकी ५ हजार रुपये रोख दंड वसूल करण्यात आला आहे.




