
अमळनेर:- प. पु. प्रमुख स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा झालेल्या येथील स्वामीनारायण मंदिराचा रविवार दि. ७ जानेवारी रोजी २८ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आहे.

प.पु. महंत स्वामी महाराज यांच्या कृपेने रविवारी सकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत भगवान स्वामीनारायण, गुणतीतानंद स्वामी महाराज,घनश्याम महाराज, राधाकृष्ण या मुर्त्यांचे अभिषेक दर्शन त्यानंतर ८ ते १० या वेळेत महापूजा,१० वाजता महाआरती, १० ते ११ संतांचे प्रवचन,कीर्तन होणार आहे.तरी भाविक भक्तांनी या वर्धापनदिन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन खान्देशचे संत निर्देशक योगीस्नेह स्वामी, पु. अखंडमुनी स्वामी यांनी केले आहे.




