दहिवद शिवारात शेतीपयोगी साहित्याच्या चोरीचे सत्र सुरूच…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद शिवारात गेल्या काही दिवसांत तब्बत १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतून पाण्याचे पंप, स्टार्टर, वायरचे बंडल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रारही दिलेली आहे. मात्र पोलिसानी घटनास्थळी भेटही न दिल्याने चोरांची हिम्मत वाढली असून शिवारात चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत.

दहिवद येथील तुषार विश्वासराव पाटील यांनी 3 महिन्यांपूर्वीच पाण्याचा पंप चोरीची तक्रार पोलिसात दिली आहे. सदर चोर हा गावातीलच असल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी यात लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान आतापर्यंत कुशल पाटील,प्रताप पाटील, त्र्यंबक माळी, किशोर पाटील यांच्या मोटर व केबल तर तुषार पाटील, पन्नालाल पारधी, जीवन माळी, शरद पाटील, मनोहर पाटील,दिलीप पाटील, जगन्नाथ पाटील यांच्या मोटारी तर प्रवीण पाटील यांचे स्टार्टर तर रामदास माळी यांची केबल चोरीस गेली आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे.




