मलकापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत केली उल्लेखनीय कामगिरी…
अमळनेर:- प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी शिंदे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याने तिची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाआतील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी मिलिंद कुमार शिंदे हिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिच्या या खेळीच्या आधारावर तिची गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १० जानेवारी पासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीयस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सृष्टी हिला दिनांक ५ ते ९ जानेवारी रोजी मलकापूर येथे होणाऱ्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहण्याबाबत पत्र आले आहे. सृष्टी शिंदे ही प्रताप महाविद्यालयाच्या इतिहासात क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड होणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. सदर ऐतिहासिक निवडीबद्दल सृष्टी शिंदे हिचे खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्षा माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक, प्राचार्य प्रा. डॉ अरुण जैन, सहचिटणीस प्रा. डॉ. धीरज वैष्णव, सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, क्रीडा संचालक अमृतलाल अग्रवाल, क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, संजय पवार, सचिन पवार, अर्चना पाटील, प्रशांत देवकते, सर्व प्राध्यापक बंधू- भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सर्व खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.