
अमळनेर:- येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटातर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला.आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्षांनी दिलेला निकाल लोकशाहीला मारक असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील मंगलमूर्ती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या.यावेळी नाना ठाकूर, विजय पाटील, चंद्रशेखर भावसार, सचिन पाटील,मोहन भोई, बाळासाहेब पवार,देवेंद्र देशमुख, बी.यु. पाटील,रवींद्र पाटील,महेश कदम,विलास पवार,अनंता निकम, उज्वला कदम,राजू मराठे, मनीषा परब तसेच शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




