
अमळनेर:- अमळनेर तालुका भाजपाची जंबो कार्यकारिणी तालुकाध्यक्ष हिरालाल शांताराम पाटील यांनी जाहीर केली असून सदर कार्यकारिणीत ११३ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सदर तालुका कार्यकारणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने ना. देवेंद्र फडणवीस, ना.गिरीश महाजन, विजय चौधरी, रवीजी अनासपुरे, जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, खा. उन्मेष पाटील आणि मा. आ. स्मिता उदय वाघ यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष यांनी अमळनेर तालुकाध्यक्ष जाहीर केली आहे. सदर कार्यकारिणी करताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मेळ बसवून सामाजिक व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सर्वांना सहभागी करण्याचा प्रयत्न तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केला असून पक्षाचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी सक्षम ठरणार आहे. सदरील निवडीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन व स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
अशी आहे तालुका कार्यकारिणी…
तालुकाध्यक्ष पदी हिरालाल शांताराम पाटील हे असून दहा उपाध्यक्ष, तीन जणांची सरचिटणीस पदी तर आठ जणांची चिटणीसपदी व कोषाध्यक्ष पदी – सरलाबाई पाटील तसेच ४० सदस्य, व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ५० जेष्ठ नेते व पदाधिकारी यांचा समावेश आहे.




