
अमळनेर:- येथील पलिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण यांची नंदुरबार नगरपरिषदेत विनंती बदली करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालयास केलेल्या विनंतीनुसार चव्हाण यांची बदली झाली असून याबाबत नगरपरिषद संचालनालयाचे आदेश दि 9 जानेवारी रोजी प्राप्त झाले आहेत. चव्हाण हे गेल्या 27 वर्षांपासून अमळनेर पालिकेत सेवारत होते,कालांतराने त्यांची बढती होऊन स्वच्छता तथा आरोग्य निरीक्षक या पदावर ते विराजमान झाले होते,अनेक वर्षे या पदावर असताना त्यांनी आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावले. कोरोना काळ असो किंवा स्वच्छतेची कोणतीही मोहीम अथवा उपक्रम असो त्यातही उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली. स्वच्छता निरीक्षक म्हणून पदस्थापनेनंतर केडरमध्ये त्यांचा समावेश झाला होता. यामुळेच ये बदलीपात्र ठरले होते,त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव बदलीची विनंती केल्याने त्यांची विनंती मान्य झाली आहे.




