अमळनेर:- अखिल भारतीय संत समिती निर्देशक मंडळचे सदस्य तथा अमळनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदीर संस्थानचे अध्यक्ष, मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज हे राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येस रवाना झाले.
अयोध्या नगरीत श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून त्यांना निमंत्रण पत्र प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज अयोध्याकडे मार्गस्थ झाले असून,प्रवासाला जातांना महाराजांचे मंदीर संस्थान कडून तसेच, रस्त्याने लागणारे निम, कळमसरे, मारवड, धार, अमळनेर येथे ग्रामस्थ व भावीकांकडून स्वागत करण्यात आले.