
अमळनेर:- जळगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धेत अमळनेर येथील A१ गटात आरव संदीप पाटील याने १०० गुणांचा पेपर ४.५२ मिनिटात सोडवून १०० पैकी १०० गुण घेत राज्यस्तरीय स्पर्धेत टॉप टेन मध्ये धडक दिली. तर दक्ष भगीरथ पाटील या विद्यार्थ्याने ९९ गुण मिळवत आदेश ॲबॅकस क्लासचा गौरव वाढवला.

सदरची परीक्षा ही ८ मिनिटांची होती. या परीक्षेत आरव पाटील याने ८ मिनिटांपैकी केवळ ४.५२ मिनिटात, तर दक्ष पाटील याने ७.३८ मिनिटात आणि मृगमयी अविनाश पाटील हिने ८.०० मिनिटात पेपर सोडवला. या तिघं विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. राज्यस्तरीय स्पर्धेच्या A२ गटात आदेश ॲबॅकस क्लासचे कुमुद हेमंत मगर ८८% गुण तर गार्गी प्रविण पवार ७०% गुण व प्रणव योगेश पाटील ५१% गुण मिळवत अमळनेरचे नाव चमकवले. सदरच्या परीक्षेत जिल्ह्यातील १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात आदेश ॲबॅकस क्लासच्या सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात सहाचे सहा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना येथील आदेश ॲबॅकस क्लासच्या संचालिका सोनल निलेश मगर व सहाय्यक निलेश मगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.




