
उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दुचाकीस्वारावर पोलिसात गुन्हा दाखल…
अमळनेर :- शहरातील तहसील रोड वरील ग. स. सोसायटीच्या कार्यालयाजवळ अज्ञात मोटरसायकलने मागून धडक दिल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. त्यातील जखमी उपचारादरम्यान मयत झाल्याने अज्ञात मोटरसायकल चालकावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयंत गुलाबराव पाटील हे २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता तहसील रोड वरील ग.स. सोसायटीच्या कार्यालयाजवळ चालत असताना अज्ञात मोटरसायकल ने त्यांना मागून धडक दिली होती.यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना २२ डिसेंबर रोजी त्यांचे रुग्णालयात निधन झाले होते.माया अनंत निकम यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल चालकावर भादवि कलम ३०४अ, २२९, ३३७, ३३८, १८४, १३४ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.




