
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने पुरुष खुल्या गटातील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा १ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा २१ रोजी दुपारी दोन वाजता सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात होणार आहे. तरी जिल्ह्यातील संघांनी वेळेवर हजर रहावे असे आवाहन व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, डॉ प्रदीप तळवेलकर, प्रा डॉ देवदत्त पाटील, जयेश म्हासरे, सचिन पाटील, सुरज वराडे यांनी केले आहे.




