
अमळनेर:- अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय भाईदास पाटील तर कोषाध्यक्ष पदी विलास गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आली.

जिल्हा मानद अध्यक्ष सुनील दगा पाटील यांच्या निरीक्षणाखाली निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या साने गुरुजी सभागृहात १९ रोजी सकाळी १० वाजता सभा संपन्न झाली. या निवडीबद्दल तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.




