अमळनेर:- एकाच रात्री अज्ञात चोरट्याने मशीद व दर्गा आणि पान टपरी फोडून किरकोळ चोऱ्या केल्याची घटना दिनांक १९ ते २० रोजीच्या दरम्यान घडली.
शहरातील अंदरपूरा भागातील इलाही मशीदचे अजान देणारे मोनिस खान, आसिफ खान हे २० रोजी सकाळी ५:४५ वाजता अजान देण्यासाठी आले असता त्यांना मशिदीचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले. थोड्याच वेळात त्यांना मशिदीसमोरील अजिमोद्दीन शेख ,नजीमोद्दीन शेख यांच्या गरीब नवाज पान सेंटर देखील फोडल्याचे निदर्शनास आले. या टपरीतून ३ हजार रुपये चोरले गेले. तसेच स्टेशन रोडवरील पिर हजरत अब्दुल कादिर जीलानी दर्ग्याचा पत्रा कापून आतमधील पत्री कोठी व कपाटाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती दर्ग्याच्या ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद साबीर अली हैदर यांनी दिली. मोनिस खान यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.