
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती…
अमळनेर:- निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या नदी पात्रातील कामाला सुरुवात झाली तशी अनेक वर्षांपासून रखडलेल्या सात्री गावाच्या गृहसंपादनासाठी व ११ गावांच्या भूसंपादनासाठी निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

१९९९ पासून सात्री गावाचे गृहसंपादन रखडले होते. मंत्री अनिल पाटील यांनी ३ कोटी १२ लाख ,२६ हजार ५५९ रुपये निधी दिला आहे. त्याचप्रमाणे ११ गावांचे भूसंपादन २००३ पासून रखडले होते. त्यात कामतवाडी साठी १ कोटी २९ लाख ३८० मुंगसे १ कोटी ४६ लाख ६०६ , सावखेडा ५ लाख ४० हजार , मठगव्हाण ६ लाख ९६ हजार ३८० ,दापोरी खुर्द १२ लाख ९७ हजार ४६५ ₹ , धावडे १९ लाख ८ हजार ९५९ ₹ , नालखेडा २४ लाख ४० हजार ९९३ , गंगापूरी २६ लाख ७९ हजार २२८ ₹ ,खापरखेडा प्रज ४७ लाख ८० हजार ८२८ ₹, निंभोरा ५२ लाख ४ हजार ५२१ ₹ , दोधवद ८ लाख ७९ ६३७ रुपये असा एकूण ५ कोटी ४५ लाख, ४० हजार १८५ रुपये प्राथमिक निधी निम्न तापी प्रकल्पाकडून भूसंपादन विभागाकडे देण्यात आला आहे, असेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. हा निधी २० ते २३ वर्षांपूर्वीच्या दरानुसार असून कालांतराने दर वाढले आहेत. त्यामुळे यापुढे तशी तरतूद होईलच.
धरणात पाणी साचल्यानंतर या गावांवर कमी जास्त प्रमाणात परिणाम होणार आहेत. मात्र गृहसंपादन आणि भूसंपादन अनेक वर्षे रखडले होते. यासाठी जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समिती अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे व सात्री ग्रामस्थ यांनी वेळोवेळी अनेक आंदोलने केली होती. मात्र आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
प्रतिक्रिया…
या प्रस्तावना चालना मिळणे कामी आवश्यक त्या निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे,सदर भूसंपादन प्रस्ताव मध्ये मूल्यांकन व निवडा नुसार आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल
-अनिल पाटील, मंत्री – मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन
प्रतिक्रिया…
धरणाच्या कामासोबत भूसंपादन व गृहसंपादनाची कामे आवश्यक आहेत. अमळनेरला मंत्रिपद मिळाल्याने अनिल पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन जलद गतीने संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे
– महेंद्र बोरसे,जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समिती अशासकीय सदस्य,




