
भूगोल शास्त्र विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…
अमळनेर:-१४ जानेवारी हा दिवस भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील भूगोल शास्त्र विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भूगोल शास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास निळे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. विजयसिंग पवार यांची उपस्थिती होती. प्रा.पवार सरांनी “अवकाशावर बोलू काही” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सदरचे व्याख्यान अतिशय माहितीपूर्ण होते.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात याचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण गावीत यांनी केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र महाजन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण धनगर तसेच प्रा. अमित शिरसाठ, प्रा. चंद्रकांत जाधव व प्रा. भूषण पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.




