
अमळनेर:- चालक दिनानिमित्त अमळनेर आगारात उत्कृष्ट चालकांचा सत्कार करण्यात येवून इंधन बचतीबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक २४ रोजी रोजी चालक दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारात उत्कृष्ट केपीटीएल देणारे चालक तसेच विना अपघात सेवा देणारे चालक, तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे चालक यांचा सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थापक देवधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आगारप्रमुख इम्रान खान पठाण, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वरिष्ठ लिपिक तुषार साळुंखे, वरिष्ठ लिपिक गिरीश चुंबाळकर, चालक एस एम पाटील, चालक सुरेश मधुकर पाटील, विलास धनगर, विनोद एस. पाटील, बी जी कोळी,विजय एस बहिरम ,विजय महाजन इत्यादी चालक वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी २५ वर्ष विना अपघात सेवा देणारे चालक गबा बिऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी चालक बांधवांना विना अपघात सेवा देणे बाबत तसेच उत्कृष्ट कॅपिटल आणून इंधन बचती संदर्भात चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बस स्थानक परिसरात उद्घोषणा करून सर्व चालकांना चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमप्रसंगी बॅनर लावून तसेच रांगोळी काढूत खडीसाखरचे वाटप करून तसेच चालकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच आगार व्यवस्थापक यांनी व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या आवाहनचे छायांकित प्रती चालकांना देण्यात आल्या. एसटी अजून उत्तरोत्तर प्रगतीकडे कशी करता येईल याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.




