
मुख्य पिंपळेरोडवरील काँक्रीटीकरणाचे काम दर्जेदार करण्याची केली मागणी…
अमळनेर :- शहरातील पिंपळेरोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले असून काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा कृती समितीच्या नागरिकांनी निवेदन देऊन केली आहे.
गुरुवारी मुख्य पिंपळेरोड रस्त्याचे क्रॉक्रीटीकरणाचे काम करण्यास पालिकेने सुरुवात केलेली आहे. पिंपळेरोडच्या
नागरिकांना पुर्वीच्या अनुभवानुसार डांबरी करणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. परंतु ६ महिन्यातच सदर कामाची दुरावस्था झाली होती. व त्यामुळे नागरिकांचे खुप हाल झाले होते. अंदाजित ६० लाख रुपये किंमतीचे काम कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्या निकृष्ट रस्त्यांच्या संदर्भात यापुर्वी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्याशी दुरुस्ती संदर्भाबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. आता सदर कामाची कार्यान्वित यंत्रणा अमळनेर नगरपरिषद असल्याने आपल्याकडुन कामाची गुणवत्ता राखण्यात यावी, अशी अपेक्षा सर्व पिंपळे रोडवरील त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरी पिंपळेरोडच्या क्रॉक्रीटीकरणाचे काम गुणवत्ता पूर्वक करण्यात अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. संदीप पाटील, विवेक पाटील, जयवंत पाटील, संदीप सोनवणे, प्रकाश पाटील, भास्कर बोरसे, राकेश बडगुजर, हर्षल पाटील, जयेश पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील, रमेश पाटील, महेश पाटील, संजय पाटील, प्रभाकर बोरसे, अशोक पाटील, नंदलाल पाटील, रविंद्र बडगुजर, अशोक पाटील यांच्यासह अनेक नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.




