
माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रा. डॉ. जयेश गुजराथी यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे दिनांक २८ रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात अध्यक्षस्थानी विजय नाना आर्मी स्कूलचे प्राचार्य पी. एम. कोळी होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी.पी. चौधरी यांनी केले. या मेळाव्याचे नॅकचे मार्गदर्शक डॉ. गुजराथी सर यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नॅकच्या ७ क्रायटेरियामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. दर्जेदार अभ्यासक्रम तथा महाविद्यालयीन गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक आहे असे प्रतिपादन केले प्राध्यापक डॉ. जयेश गुजराथी यांनी करून महाविद्यालयात भेट याविषयीची संपूर्ण माहिती सरांनी सोप्या भाषेत दिली. सदर कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी योग्य ती मदत करू असे वचन दिले. तसेच आर्मी शाळेचे प्राचार्य पी .एम. कोळी सरांनी गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या कंपनीची उदाहरणे देत महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक यांना काळानुसार बदलावे लागेल, बदल स्वीकारावा लागेल असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या माजी विद्यार्थी मेळाव्याला डॉ. एन. जी. पाचपांडे, डॉ.जे एन चव्हाण, चव्हाण, प्रा. डॉ. अंजली जोशी, प्रा.यू बी.पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत सूर्यवंशी किरण रावळ, राजेंद्र वाघ, सोपान पाटील, विनोद सोनवणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनंदा सी. तायडे यांनी केले, तर आभार डॉ. जे.एन.चव्हाण यांनी मानले.




